मंडळाविषयी​

मंडळाविषयी

विद्यार्थी साहाय्यक समितीने आपल्या इतर उपसमित्यांबरोबरच माजी विद्यार्थी मंडळ उपसमिती स्थापन केली. या उपसमितीच्या सुरुवातीला नियमित बैठका होत असत. या उपसमितीत रमाकांत तांबोळी, डॉ. अच्युतराव आपटे, बुवाजी सहस्त्रबुद्धे, वसंतराव गिंडी, डॉ. दत्ता नलावडे, एस. एन. भावसार, सुरेश वालझाडे यांचा समावेश होता. उपसमितीच्या मासिक सभा होत होत्या. परंतु उपसमितीत स्पष्टपणे कोणी बोलत नसत. त्यामुळे मंडळाचे काम पुढे सरकत नव्हते.

सन १९८२ मध्ये विद्यार्थी साहाय्यक समितीच्या सिल्व्हर ज्युबिली कार्यक्रमात माजी विद्यार्थी मंडळाची पहिली सभा नानासाहेब गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. त्यानंतर १९९१ पर्यंत बैठका होत नव्हत्या. रमाकांत तांबोळी १ ऑक्टोबर १९७६ मध्ये समितीच्या कामात सहभागी झाले. नवीन वसतिगृह सन १९७९ मध्ये अस्तित्वात आले. समितीच्या इतर कामांत व कार्यकर्ता मंडळात तांबोळी सर सहभागी होत असत. त्यावेळी माजी विद्यार्थी काय करतात, हा प्रश्न समितीचे कार्यकर्ते, पाहुणे, देणगीदार नेहमी उपस्थित करत. याकरता कोणत्याही प्रकारचे संशोधन, पाहणी कोणी करत नव्हते. तांबोळी सर माजी विद्यार्थ्यांचा शोध घेऊ लागले. त्यावेळी माजी विद्यार्थी जरी समितीकडे वळले नाहीत, तरी अनेक सामाजिक कामे त्यांनी आपल्या गावात उभी केली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सदानंद नाडकर्णी यांना बरोबर घेऊन तांबोळीसरांनी माजी विद्यार्थ्यांच्या घरी भेट देण्यास सुरुवात केली. त्यांच्या घरातील कार्य, लग्न समारंभ तसेच दुःखाच्या प्रसंगी भेट देऊ लागले. त्याचवेळी माजी विद्यार्थ्यांचे वार्षिक संमेलन घ्यावे, असे त्यांच्या मनात आले. १९९१ मध्ये पहिला मेळावा झाला. तेव्हापासून आजतागायत नियमितपणे मेळावे सुरू आहेत. मेळाव्याकरता अध्यक्ष व प्रमुख पाहुणे माजी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच असावेत, हा दंडक प्रस्थापित केला. मेळाव्याचा दिवस फेब्रुवारीचा शेवटचा रविवार निश्चित केला. माजी विद्यार्थी मंडळाच्या बैठका प्रत्येक बुधवारी होऊ लागल्या. यामुळे या कामात नियमितपणा आला. दरवर्षी माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींची उपस्थिती वाढतच गेली. मेळावे समितीच्या जागेतच भरवावेत, असे निश्चित करण्यात आले. आजपर्यंत मेळावे ठरलेल्या दिवशीच झाले.

एक आदर्श संकल्पना...

मंडळाची उद्दीष्टे​

१. समिती संपर्क केंद्र वाढविणे
2. माजी विद्यार्थी आरोग्य मदत
3. माजी विद्यार्थी सभासद संख्या वाढविणे
4. समिती पालक वाढविणे
0 +
सामाजिक उपक्रम
400 +
सभासद
15
वार्षिक मेळावे
Open chat
नमस्कार 👋
मी कशाप्रकारे आपली सहायता करू शकतो